www.24taas.com, झी मीडिया, अमेरिका
अमेरिकेच्या ओहयोमध्ये गेल्या शुक्रवारी दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या... आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही बहिणींनी एकमेकींचा हात पकडूनच जन्म घेतला.
जन्मानंतर या दोन्ही मुलींना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण, ता त्या कोणत्याही उपकरणाशिवाय नैसर्गिक पद्धतीनं श्वास घेऊ शकत आहेत, असं या जुळ्या बहिणींच्या आईनं सांगितलंय. दोघी जन्मापासूनच एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत, अशी प्रतिक्रिया या मुलींच्या आई सारा थिसल्थवॅट यांनी दिलीय.
या दोघींचं नामकरणही करण्यात आलंय... जिलिएन आणि जेना अशी त्यांची नावं... या दोन्ही मुलींचा जन्म एका दुर्लभ स्थितीत झालाय. दोघीही गर्भावस्थेदरम्यान ‘एम्नयोटिक सॅक आणि प्लॅसेंटा’ शेअर करत होत्या. या अवस्थेलाच मोनोएम्नियोटिक बर्थ असं म्हणतात. असं दहा हजारांतून एखाद्या केसमध्ये घडतं.
सारा थिसल्थवॅट या 32 वर्षांच्या आहेत. या पद्धतीच्या गर्भावस्थेत दोन्ही बाळांची नाळ एकमेकांच्या नाळेमध्ये गुंतण्याची शक्यता असते. त्यामुळेच, गर्भावस्थेदरम्यान एकरॉन जनरल मेडिकल सेंटरमध्ये कित्येक आठवडे त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.
‘आपल्या दोन्ही बाळांना आपल्या कुशीत घेणं हाच माझ्यासाठी मदर्स डे निमित्ताचं सर्वात मोठं गिफ्ट असल्याचा’ सारा यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.