www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्तंबूल
तुर्कस्थानमध्ये कोळशाच्या खाणीत स्फोट झालाय यास्फोटात 201 जण ठार झाल्याची तर अनेक जण अडकल्याची माहिती मिळत आहे. तुर्की-सोमा कोळसा खाणीत हा स्फोट झालाय. या स्फोटानंतर खाणीमध्ये प्रचंड आग पसरली आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. मदत आणि बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पश्चिम तुर्कस्तानमध्ये झालेल्या कोळसा खाण स्फोटात किमान 201 लोकांचा बळी गेलेत. गेल्या दोन दशकातील तुर्कस्तानमधील मोठी घटना आहे. शकडो लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
कोळसा खाणीमध्ये 787 लोक काम करीत होते. त्यावेळी खाणीमध्ये स्फोट झाला. त्यावेळी 363 लोक काम करीत होते. यापैकी 80 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या मोठ्या दुर्घनेबाबत राष्ट्रवती अब्दुल्ला गुल यांनी दु:ख व्यक्त केलेय. त्यांनी या घटनेनंतर तात्काळ सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. खाणीतील लोकांना ऑक्जिन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 400 लोक मदतकार्यासाठी सक्रीय झाले आहेत. मात्र, हा स्फोट कोणत्या कारणाने झालाय, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तो कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.