पाहा, स्फूर्तिदायक 'ही नेम्ड मी मलाला'चा ट्रेलर

नॅशनल जिओग्राफिक चॅनल अॅकेडमी पुरस्कार विजेता डेविस गुगेनहीम यांच्या नजरेतून 'ही नेम्ड मी मलाला' ही डॉक्युमेंटरी जगाच्या समोर येतेय. याच डॉक्युमेटरींचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jun 24, 2015, 10:18 AM IST
 पाहा, स्फूर्तिदायक 'ही नेम्ड मी मलाला'चा ट्रेलर  title=

वॉशिंग्टन : नॅशनल जिओग्राफिक चॅनल अॅकेडमी पुरस्कार विजेता डेविस गुगेनहीम यांच्या नजरेतून 'ही नेम्ड मी मलाला' ही डॉक्युमेंटरी जगाच्या समोर येतेय. याच डॉक्युमेटरींचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

२०१६ मध्ये ही डॉक्युमेंटरी १७१ देशांत आणि ४५ भाषांत प्रसारित होणार आहे. पाकिस्तानातील मुलगी मलाला युसुफजई हिच्यावर चित्रित करण्यात आलेली ही डॉक्युमेंटरी लवकरच जगभरातील विविध थिएटर्समध्ये प्रसारित करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक चॅनलनं फॉक्स सर्चलाईट पिक्चर्ससोबत हात मिळवणी केलीय. 
 
मुलींनाही शिक्षण मिळावं यासाठी अभियान सुरू करणाऱ्या मलालावर २०१२ साली पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात तालिबाननं गोळ्या घातल्या होत्या. शाळेतून परतणाऱ्या मलालाच्या डोक्यात गोळी घुसली होती. परंतु, ती या हल्ल्यातून वाचली. २०१४ मध्ये मलाला हिला नोबेल शांति पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. 

पाहा, 'ही नेम्ड मी मलाला'चा ट्रेलर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.