...ही आहे ऑफिसला दांडी मारण्यासाठी उत्तम थाप!

दररोजच्या कटकटिला, कामाच्या ताणाला किंवा सहजच म्हणून तुम्हीही ऑफिसला एखादी बुट्टी मारली असेल... पण, यावेळी बॉसला अशी कारणं देता येत नाही म्हणून तुम्हीही काहीतरी शक्कल लढवली असेल! पण, तुम्हाला माहित आहे की, कोणतं कारण दिल्यानं हमखास सुट्टी मिळते?

Updated: Sep 3, 2015, 12:17 PM IST
...ही आहे ऑफिसला दांडी मारण्यासाठी उत्तम थाप! title=

नवी दिल्ली : दररोजच्या कटकटिला, कामाच्या ताणाला किंवा सहजच म्हणून तुम्हीही ऑफिसला एखादी बुट्टी मारली असेल... पण, यावेळी बॉसला अशी कारणं देता येत नाही म्हणून तुम्हीही काहीतरी शक्कल लढवली असेल! पण, तुम्हाला माहित आहे की, कोणतं कारण दिल्यानं हमखास सुट्टी मिळते?

एका सर्व्हेनुसार, ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक 'फ्लू' असल्याची थाप मारतात... आणि गंमत म्हणजे, संसर्गजन्य आजाराच्या भीतीनं बॉस त्यांना तातडीनं सुट्ट्याही देऊन टाकतात. 

ब्रिटनमध्ये हा सर्व्हे करण्यात आलाय. यासाठी जवळपास २००० लोकांवर सर्व्हे करण्यात आला. यात १००० बॉस आणि १००० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 

या सर्व्हेनुसार, डोकंदुखी, कंबरदुखी हे सुट्टी घेण्यासाठी कारणं असू शकतात असं पाच बॉसपैंकी केवळ एक बॉस मानतो. इतकंच नाही तर, अपघात किंवा एखादं छोटंसं ऑपरेशनही बऱ्याचदा बॉसची सहानुभूती मिळवू शकत नाही. 

पण, जवळपास ४१ टक्के बॉस 'फ्लू'चं कारण सुट्टी घेण्यासाठी योग्य मानतात. त्यांच्या मते, एखादा कर्मचारी संसर्गजन्य आजाराला बळी पडला असेल तर त्यानं घरी राहूनच आराम करावा.

या सर्व्हेत सहभागी असणाऱ्या जवळपास ७ टक्के कर्मचाऱ्यांनी हे मान्य केलंय की सुट्टी मिळवण्यासाठी ते आपल्या बॉसला आजारी असल्याची थाप मारतात. तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त अवस्थेत कर्मचारी अशा थापा मारतात. ४० टक्के कर्मचाऱ्यांनी हे मान्य केलंय की सुट्टी घेण्याचं खरं कारण ते कधीही बॉसला सांगत नाहीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.