www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकेत एका आठ वर्षीय विद्यार्थीनीच्या पँन्टच्या मागच्या खिशात ठेवलेल्या आयफोनचा स्फोट झालाय. या घटनेत ही विद्यार्थीनी गंभीर जखमी झालीय.
घटनेच्या वेळी ही मुलगी आपल्या शाळेत वर्गात बसली होती. पँन्टच्या खिशात ठेवलेल्या आयफोनमधून अचानक वास येऊ लागला आणि काही वेळातच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे या विद्यार्थीनीच्या पायांजवळ गंभीर जखम झालीय.
केनबंक्सच्या मिडल स्कूलच्या या विद्यार्थीनीवर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापक जैफरी रोडमॅन यांनी न्यूयॉर्क डेलीला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा लगेचच सुरक्षा म्हणून या वर्गाला रिकामं करण्यात आलं.
ही विद्यार्थीनी खाली वाकली आणि जोरात स्फोटाचा आवाज आला. रोडमॅन यांच्या म्हणण्यानुसार, इतर विद्यार्थ्यांनी तातडीनं जाऊन तिची पँन्ट बाजूला केली. या स्फोटाच्या कारणांचा तपास सध्या सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.