मी सुट्टीवर जाणार नाही, राजीनामा देणार नाही - नवाझ शरीफ

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असाताना सत्ता परिवर्तनासाठी आंदोलन होत आहे. याचे नेतृत्व इम्रान खान करीत आहे. याला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चोख उत्तर दिलेय. मी सुट्टीवर जाणार नाही शिवाय राजीनामा देणार नाही.

Updated: Sep 2, 2014, 02:10 PM IST
मी सुट्टीवर जाणार नाही, राजीनामा देणार नाही - नवाझ शरीफ title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असाताना सत्ता परिवर्तनासाठी आंदोलन होत आहे. याचे नेतृत्व इम्रान खान करीत आहे. याला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चोख उत्तर दिलेय. मी सुट्टीवर जाणार नाही शिवाय राजीनामा देणार नाही.

पाकिस्तानमध्ये तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान आणि तहिरुल काद्री या धर्मगुरुंच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी चालविलेल्या जोरदार आंदोलनाच्या दबावाखाली न झुकण्याची स्पष्ट भूमिका पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी घेतली.

पाकमधील राजकीय पक्षाच्या नेत्यांसमोर बोलताना काही लोकांनी संपूर्ण देशाने निवडून दिलेल्या सरकारवर दबाव आणून ते पाडण्याचा घातक पायंडा आपण देशामध्ये पडू देणार नाही, असे शरीफ यांनी स्पष्ट केले.

नवाझ शरीफ यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढलेय, पाकिस्तानचे भविष्य हे लोकशाहीशी निगडित आहे. मार्ग भरकटल्यास अशी परिस्थिती पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते, असे म्हटले आहे. 

पाकिस्तानमध्ये इम्रान खान व काद्री यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्टपासून सरकारविरोधी आंदोलन सुरु झाले आहे. विरोधकांनी निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप करीत शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.