दृष्टीदोष टाळण्यासाठी अनोखी शक्कल

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि मुलांमध्ये दृष्टीदोष निर्माण होवू नये यासाठी चीनमधील शाळेने एक अनोखा प्रयोग केला आहे.

Updated: Feb 23, 2014, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि मुलांमध्ये दृष्टीदोष निर्माण होवू नये यासाठी चीनमधील शाळेने एक अनोखा प्रयोग केला आहे.
हुबेई प्रातांतील एका शाळेत लहान मुलांसाठी एक विशिष्ट प्रकारचा बेंच बनवण्यात आला आहे.
मुलांच्या नजरेसमोर एक मेटल बार लावलण्यात आला आहे. मुलांचे डोळे आणि पुस्तकं यांच्यात गरज असेल तेवढ अंतर असावं, यामागे हा उद्देश आहे.
झँग लिन एलमेंट्री स्कूलचे हेडमास्तर झँग जियानमिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मेटल बार `टीन एंटी-मायोपिआ` (अदूरदर्शिता) डिपार्टमेंटने लावलेले आहेत.
यामुळे मुलांना योग्य पद्धतीने वाचण्याची सवय लागेल, तसेच त्यांचे डोळेही सुरक्षित राहतील. या मेटल बारना उठताना आणि बसताना गरजेनुसार मागे पुढे करता येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.