www.24taas.com, इस्लामाबाद
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी क्रूरकर्मा अजमल आमीर कसाबला फासावर लटकवल्यानंतर पाकिस्तानी नेते मुक्ताफळं उधळू लागलेत. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि नेता इम्रान खानही मागे नाही. अजमलच्या मृत्यूचा बदला सरबजीतसिंगला फासावर लटकावून घ्या...
असा आदेशवजा सल्लाच त्यानं पाकिस्तान सरकारला दिलाय. खरं तर जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि खिलाडू वृत्तीचा राजकीय नेता अशी इम्रान खानची ओळख आहे. मात्र त्याच्या या बेताल वक्तव्यामुळे सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायेत. तालिबानचा चेहरा आणि प्रकृती मुळातच क्रूर आहे. त्यात इम्रान सारख्या खेळाडूनं केलेलं वादग्रस्त वक्तव्य या संघटनांना बळ देणारं ठरू शकतं.
इम्रान खानला सत्तेचे वेध लागले आहेत आणि त्यासाठी लष्कराशी सलगी साधणं जसं आवश्यक आहे तसच धार्मिक संघटनांची सहानुभूतीही हवी आहे. त्यासाठीच इम्राननं अशी उठवळ केली. मात्र अशा तद्दन जाहिरातबाज विधानांनी सत्ता मिळत नसते हेही लवकरच इम्रान खानला कळेल यात शंका नाही.