व्यंगचित्रावरून न्यूयॉर्क टाइम्सची माफी

भारताची मंगळमोहिम यशस्वी झाली, यावर न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक व्यंगचित्र छापून आलं, पण ही मस्करी नव्हती, तर ही भारताची केलेली थट्टा होती. हे या व्यंगचित्राच्या प्रकाशाननंतर दिसून आलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या या चित्रानंतर न्यूयॉर्क टाइम्सवर जोरदार टीका झाली.

Updated: Oct 6, 2014, 04:15 PM IST
व्यंगचित्रावरून न्यूयॉर्क टाइम्सची माफी title=

न्यूयॉर्क : भारताची मंगळमोहिम यशस्वी झाली, यावर न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक व्यंगचित्र छापून आलं, पण ही मस्करी नव्हती, तर ही भारताची केलेली थट्टा होती. हे या व्यंगचित्राच्या प्रकाशाननंतर दिसून आलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या या चित्रानंतर न्यूयॉर्क टाइम्सवर जोरदार टीका झाली.

भारताच्या मंगळयानाने 24 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला, भारत जगातला असा पहिला देश आहे, ज्या देशाला मंगळ ग्रहाच्या कक्षेत यान पाठवण्यात पहिल्याचं यश आलं. याआधी मंगळावर अमेरिका, रशिया आणि युरोपातील काही देशांनी यान पाठवले आहेत, पण त्यांना अनेक वेळा प्रयत्न करावे लागले, भारताने मात्र पहिल्याच प्रयत्नात यश खेचून आणलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये व्यंगचित्र काढण्यात आलं आहे, एक शेतकरी आपल्या बैलाला घेऊन मंगळ ग्रहावर पोहोचला आणि दार ठोठावतोय, आता तीन-चार विकसित देशांचे, पश्चिम देशातले शास्त्रज्ञ बसलेले आहेत, आणि यावर लिहलंय एलीट स्पेस क्लब.

या व्यंगचित्रावरून न्यूयॉर्क टाइम्सला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला, काही लेखकांनी भारतासारख्या विकासशील देशांविषयी या करून घेतलेला पूर्वग्रह असल्याचं सांगितलं.

न्यूयॉर्क टाइम्सची माफी
न्यूज पेपरच्या संपादकीय पेजचे संपादक ऍण्ड्रू रॉजेंथॉल यांनी लिहलंय, आम्हाला अनेक वाचकांच्या तक्रारी मिळाल्या. मात्र कार्टूनिस्ट हेंग किम सॉन्ग यांचा व्यंगचित्रामागील उद्देश हाच होता, की फक्त विकसित नाही, तर विकसनशील देशही मंगऴापर्यंत पोहोचत आहेत.

"सिंगापूरमध्ये काम करणारे हेंग नेहमी आंतरराष्ट्रीय मुद्यांवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून या प्रकारचं चित्र समोर ठेवतात. जर या व्यगंचित्राच्या माध्यमातून वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही याबद्दल माफी मागतो." 

"हेंग कोणत्याही पद्धतीने भारताचे नागरिक आणि भारत सरकारला कमी लेखू इच्छीत नाहीत, याबाबतीत आम्हाला आनंद आहे की, वाचकांनी त्यांचं म्हणणं आमच्यासमोर ठेवलं".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.