भारताची अवस्था पाकिस्तानहूनही दारुण

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या चॅरीटी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक भयानक बाब उघडकीस आली आहे. भारतातील मातांची अवस्था पाकिस्तानातील मातांपेक्षा भयावह आहे.

Updated: May 8, 2013, 06:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या चॅरीटी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक भयानक बाब उघडकीस आली आहे. भारतातील मातांची अवस्था पाकिस्तानातील मातांपेक्षा भयावह आहे.
‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील मातांचे आयुष्य पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे. भारतात ३ लाख नवजात अर्भकं जन्मल्यावर पुढील २४ तासात मरण पावतात. अशा मृत्यूंमध्ये भारताचा क्रमांक वर आहे. तसेच जगात प्रसूतीदरम्यान मातांच्या होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये २९ टक्के प्रमाण भारतात आहे.
आई बनण्याच्या अनुभवाबाबत जगात आजही असमानता आढळून येते. भारतात ३ लाख नवजात अर्भक २४ तासात मरण पावतात. अहवालानुसार मागील काही दशकामध्ये संपूर्ण जगात आई आणि नवजात शिशुचे जीवन सुरक्षित झाले आहे. पण आजही दहा लाखांहून जास्त अर्भक जन्माला येण्याआधी मरण पावतात. या कारणास्तव आईच्या जीवाला धोका निर्माण होतो. गरीब देशात याचे प्रमाण जास्त असते.

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेने गर्भधारणेच्या काळात अर्भकाचा मृत्यू, प्रसूतीच्या दरम्यान मृत्यू, पाच वर्षाच्या मुलांचा मृत्यूदर आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचा मृत्यूदर या माहितीच्या आधारावर जगातील देशांचे क्रमवारी केली आहे. याबाबतीत युरोपीय देशांपैकी फिनलँड पहिल्या, स्वीडन दुसऱ्या आणि नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.