www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेतल्या अरिझोनाममध्ये एका २९ वर्षीय भारतीय अमेरिकन तरुणानं देवाला प्रसन्न करण्यासाठी १०० फूट खोल दरीमध्ये उडी मारलीय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्यातून सुखरुप बचावलाय.
अरिझोना इथं उल्का पिंड पडल्यानं ही १०० फूटांपेक्षा जास्त खोल दरी निर्माण झालीय. प्रेक्षकांसाठी हे चांगलंच प्रेक्षणीय स्थळ बनलंय. उणे २० अंश डिग्री आणि शीत वाऱ्यांच्या लहरी वाहत असताना २८ वर्षीय परमिंदर सिंग यानं या विवारात उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी तब्बल आठ तास बचाव अभियान सुरू होतं. ११ जानेवारी रोजी परमिंदर यानं स्वखुशीनं या विवरात उडी मारली. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे कृत्यं केल्याचं त्यानं म्हटलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमिंदरला वाचविण्यासाठी तीन एजन्सीजचे जवळजवळ ३० कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. यासाठी हेलिकॉप्टरची मदतदेखील घेण्यात आली. गोठवणाऱ्या थंडीतही हे बचावकार्य तब्बल आठ तास सुरू होतं.
आडव्या तारांमध्ये अडकल्यानं परमिंदर बचावला गेलाय. अधिकाऱ्यांनी परमिंदरला सध्या एका मेडिकल सेन्टरमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.