भारतीय मुलीचं नाव 'आंतरराष्ट्रीय बालशांती पुरस्कारा'च्या घोडदौडीत

जागतिक बालशांतता पुरस्कारासाठी भारतीय वंशाच्या कहकशा बासूची अंतिम तिघा जणांमध्ये निवड करण्यात आलीय. मूळची भारतीय असलेली कहकशा सध्या युएईमध्ये राहते.

Updated: Nov 23, 2016, 06:19 PM IST
भारतीय मुलीचं नाव 'आंतरराष्ट्रीय बालशांती पुरस्कारा'च्या घोडदौडीत  title=

नवी दिल्ली : जागतिक बालशांतता पुरस्कारासाठी भारतीय वंशाच्या कहकशा बासूची अंतिम तिघा जणांमध्ये निवड करण्यात आलीय. मूळची भारतीय असलेली कहकशा सध्या युएईमध्ये राहते.

या पुरस्कारासाठी जगभरातून 120 मुलांना शॉर्ट लिस्ट करण्यात आलं होतं. त्यांच्यामधून तीन जणांची निवड करण्यात आलीय. 16 वर्षांची कहकशा बासू पर्यावरण रक्षणासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करतेय. 

आठ वर्षांची असताना तिनं दुबईत आपल्या घराशेजारी रिसायकलिंग वेस्टचा प्रकल्प उभारला होता. 2012 मध्ये तिनं स्वतःची 'ग्रीन होप' नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती, किनारे स्वच्छता आणि पर्यावरण जागरुकतेचं काम करते. कहकशाला आतापर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

कहकशाबरोबर कॅमेरूनची डिव्हियाना मालूम आणि सीरियातली रेफ्युजी मुझून अलमेलेहान या तिघींमधून बालशांतता पुरस्कारासाठी अंतिम निवड केली जाणार आहे. कॅमेरूनची डिव्हियाना हिंसाचाराविरोधात जागृती करते, तर सीरियाची रेफ्युजी मुझून अलमेलेहान रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करते.