पोतुर्गालचे पंतप्रधान भारतीय वंशाचे, भारतीय संबंध होणार अधिक मजबूत

पोतुर्गालच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे एंटोनियो कोस्टा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती एनबिल कैवेको यांनी ही नियुक्ती केली आहे.

Updated: Nov 27, 2015, 06:53 PM IST
पोतुर्गालचे पंतप्रधान भारतीय वंशाचे, भारतीय संबंध होणार अधिक मजबूत title=

लिस्बन : पोतुर्गालच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे एंटोनियो कोस्टा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती एनबिल कैवेको यांनी ही नियुक्ती केली आहे.



एंटोनियो यांचे आजोबा अफोन्सो मारिया गोव्यातील मडगाव येथे राहत होते. एंटोनियो यांचे वडील ओरलॅंडो पोतुर्गालचे प्रसिध्द् कवी आहेत. त्यांनी 'शाइन ऑफ अॅंगर' हे पुस्तक लिहीले आहे. एंटोनियो यांचे नातेवाईक अजूनही भारतात राहत आहेत.    

 

१९७४ नंतर पोतुर्गालमध़्ये पहिल्यांदाच सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या समर्थनामुळे भारतीय वंशाचे पतंप्रधान होणे शक्य झाले आहे. एंटोनियो यांनी निवडणुकीनमध्ये आघाडी घेतली होती. त्यांची भाषणे गाजली होतीत. याचा फायदा त्यांच्या पार्टीला झाला. 



मी भारतीय वंशाचा असलो तरी माझ्याबाबत कोणताही भेदभाव झालेला नाही, असे त्यांनी आपल्या निवडणुकीच्या भाषणात नमुद केले होते. 



पंतप्रधान होण्याआधी एंटोनियो हे लिस्बनचे महापौर होते. त्यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापार वाढवण्यास जोर दिला होता. आता ते पंतप्रधान झाल्यामुळे भारत आणि पोतुर्गाल या दोन्ही देशातील संबंध अजून जास्त मजबूत होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.    



दरम्यान, एंटोनियो कोस्टा पोतुर्गालचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.