नवी दिल्ली : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तेत आलेल्या सीपीएनच्या एका वरिष्ठ नेत्यांनं भारताला सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नेपाळ भारताची गुंडगिरी स्वीकारणार नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबध ठेवायचे आहेत. सीपीएन (यूएमएल) चे सचिव प्रदीप ग्यावली यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की त्यांनी संध्या दोघांमधील वाढलेल्या तणाव दूर करण्यासाठी प्राधान्य द्यावे.
प्रदीप ग्यावली म्हणतात की 'भारतासोबत आम्हाला समानतेच्या आधारावर विकास करायचा आहे आणि चीनच्या बाबतीतही आमची हिच भूमिका आहे. भारत असो वा इतर कोणताही देश असो गुंडगिरीची वागणूक आम्ही स्वीकारणार नाही.
'भारत हा महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. भारताला जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडायची असेल तर त्याआधी भारताला शेजारील देशांसोबत चांगले संबध ठेवावे लागतील अन्यथा त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातील.' असं ही प्रदीप ग्यावली यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.