रशिया म्हणतो, त्यांच्या नागरिकांसाठी भारत असुरक्षित

इजिप्त आणि तुर्कीनंतर आता रशियाने त्यांच्या नागरिकांसाठी भारतही पर्यटनासाठी असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. पर्यटन यात्रेसाठी सुरक्षित असलेल्या देशांच्या यादीतून भारताला वगळण्यात आले आहे. रशियातील पुतीन सरकारने नागरिकांसाठी सुरक्षित असलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली या यादीत गोव्याच्या नावाचा समावेश नाही. 

Updated: Nov 29, 2015, 04:23 PM IST
रशिया म्हणतो, त्यांच्या नागरिकांसाठी भारत असुरक्षित title=

नवी दिल्ली : इजिप्त आणि तुर्कीनंतर आता रशियाने त्यांच्या नागरिकांसाठी भारतही पर्यटनासाठी असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. पर्यटन यात्रेसाठी सुरक्षित असलेल्या देशांच्या यादीतून भारताला वगळण्यात आले आहे. रशियातील पुतीन सरकारने नागरिकांसाठी सुरक्षित असलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली या यादीत गोव्याच्या नावाचा समावेश नाही. 

ऱशियाने आपल्या देशांतील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित पर्यटन ठिकाणांच्या यादीतून भारताचे नाव वगळलेय. रशियातील न्यूज एजन्सी इंटरफॅक्सनेही माहिती दिलीय. या निर्णयाचा मोठा फटका गोवा पर्यटनाला बसणार आहे. याआधी रशियाची करंसी रुबेलच्या घसरणीमउळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला होता. 

गेल्या ३१ ऑक्टोबरला सिनाई पेनिनसुएलामध्ये रशियाच्या विमानातील स्फोटप्रकरणानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी इजिप्तला जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द केली होती. तसेच तुर्कीदेशातून रशियन नागरिकांना माघारी बोलवण्यात आले होते. रशियाने जारी केलेले यादीत भारतासह क्युबा, दक्षिण व्हिएतनाम आणि दक्षिण चीनचाही समावेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.