नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय.
या महिलेचं नाव वहिदा मोहम्मद अल-जुमइली आहे. वहिदाला 'हंनादी' नावानंही ओळखलं जातं... हंनादीच्या म्हणण्यानुसार, तीनं नुकतंच आयएसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून ते भांड्यामध्ये शिजवलेत...
हंनादी ७० लोकांच्या एका समुहाचं नेतृत्व करतेय. आपली संघटना आयएसच्या दहशतवाद्यांशी लढून सरकारला मदत करत असल्याचा दावा तीनं केलाय. पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या ग्रामीण इराक भागात एका महिलेनं दहशतवाद्यांविरुद्ध पुकारलेलं हे बंड म्हणूनच उल्लेखनीय ठरतं.
दहशतवादीही हंनादीला टिपायला बसलेत. बगदादीसहीत अनेक दहशतवाद्यांकडून तिला धमक्या मिळाल्याचं तीनं एका मुलाखतीत म्हटलंय. आपल्या पतीला आयएसच्या आयएसच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीनं ठार मारल्याचं हंनादीनं म्हटलंय. शिवाय वडील आणि तीन भावांनाही आयएसच्या दहशतवाद्यांनी ठार केल्याचं तीनं म्हटलंय. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपण आयएसच्या दहशतवाद्यांना ठार करून त्यांचे मुंडके शिजवतो, असंही ती म्हणतेय.