पाकिस्तानकडून खरेदी करणार अणुबॉम्ब - इसिस

 दहशदवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' येणाऱ्या काळात पाकिस्तानकडून अणुबॉम्ब खरेदी करू शकते असा दावा 'इसिस'नं केलाय.

Updated: May 23, 2015, 05:03 PM IST
पाकिस्तानकडून खरेदी करणार अणुबॉम्ब - इसिस  title=

इराक :  दहशदवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' येणाऱ्या काळात पाकिस्तानकडून अणुबॉम्ब खरेदी करू शकते असा दावा 'इसिस'नं केलाय.

इसिसने त्यांच्या 'दाबिक' या मासिकात हा खुलासा केलाय. पाकिस्तानच्या लष्करातील अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करुन अनुबॉम्ब मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा खुलासा करण्यात आला आहे. 

ब्रिटीश नागरिक जॉन कॅंटाली यांना इसिसने बंधक बनवलं होतं. 'द पर्फेक्ट स्टॉर्म' या लेखात इसिसने हा दावा केला आहे. त्यानुसार शस्त्रास्त्र दलालांकडून अणुबॉम्ब खरेदी करण्याची तयारी केली जाते. यासाठी पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. 

तसेच विविध मार्गांनी ही अण्वस्त्रे अमेरिकेत नेऊन तेथे हमला करण्याची इच्छा इसिसची आहे. इसिस यावेळी काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे. इसिसचा प्रभाव जंगलातील आगीप्रमाणे पसरतोय, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असं या लेखात म्हटलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.