ग्वाटेमाला : उत्तर अमेरिकेत एका १६ वर्षांच्या मुलीला एका घोळक्यानं अत्यंत क्रूररित्या मारहाण केल्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आल्याची एक घटना समोर आलीय.
ही घटना ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीलगत असलेल्या रियो ब्रावो या भागातील आहे.
यूट्यूबवर या भयंकर घटनेचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यापूर्वी हजारो वेळा पाहिला गेला होता. सध्या या घटनेची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
जवळपास ३८ सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हा सगळा प्रकार स्पष्टपण दिसतोय.
एका टॅक्सी ड्रायव्हरला लुबाडून त्याला ठार करणाऱ्या एका गटात ही अल्पवयीन मुलगीही सहभागी असल्याचं सांगितलं जातंय. कथितपणे, या मुलीनं तिच्या दोन साथीदारांसोबत मिळून एका ६८ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हरला गोळ्या घालून ठार केलं.
यानंतर, इतर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले पण ही मुलगी मात्र रियो ब्रावोमध्ये घोळक्याच्या तावडीत सापडली.... यानंतर या घोळक्यानं अत्यंत क्रूरपणे तिला मारहाण करत पेटवून दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.