भारतीय धर्मगुरुला 'आयसिस'ने गुडफ्रायडेला चढवलं सुळावर

मुंबई : अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नागरिक असलेले ख्रिस्ती फादर थॉमस उझुन्नलील यांना आयसिस या दहशतवादी संघटनेने सुळावर लटकवले आहे. 

Updated: Mar 28, 2016, 04:24 PM IST
भारतीय धर्मगुरुला 'आयसिस'ने गुडफ्रायडेला चढवलं  सुळावर title=

मुंबई : अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नागरिक असलेले ख्रिस्ती फादर थॉमस उझुन्नलील यांना आयसिस या दहशतवादी संघटनेने सुळावर लटकवले आहे. शुक्रवारी म्हणजेच 'गुड फ्रायडे'च्या दिवशी त्यांना सुळावर चढवणार अशा बातम्या आल्या होत्या.

फादर टॉम उजहन्नालिल येमेनमधील एका चर्चमध्ये फादर होते. एका निवृत्त लोकांच्या वसतीगृहावर 'आयसिस'ने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांचे ४ मार्चला अपहरण करण्यात आले होते. एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार त्याचवेळी आयसिसने चार नन्ससह १६ जणांची हत्या केली होती.

काहीच दिवसांपूर्वी भारत सरकारनेही या फादरचं अपहरण झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. त्यांच्या सुटकेसाठी भारतीय परराष्ट्र खात्यानेही अनेक प्रयत्न केले होते. पण, ते प्रयत्न असफल झाले. पण, अजूनही कोणत्याही गटाने त्यांच्या हत्येची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.