आयसीसने ४ वर्षाच्या मुलाला बॉम्ब बांधला

Updated: Jan 7, 2016, 06:06 PM IST
आयसीसने ४ वर्षाच्या मुलाला बॉम्ब बांधला title=

नवी दिल्ली/अल शिराकत : जगतील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने, आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यासाठी चार वर्षाच्या मुलाच्या शरीराला बॉम्ब बांधला. बॉम्बस्फोटानंतर या लहानग्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.

हिंसा आणि दहशतवादावर आपला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी इस्लामिक स्टेटने हे कृत्य केलं. ही धक्कादायक घटना अशावेळी झाली, जेव्हा दहशतवाद्यांनी  एका आठवड्याआधी या लहानग्याच्या वडिलांना ठार मारलं होतं. 

इस्लामिक स्टेटच्या चौक्यांवर या मुलाच्या वडिलांनी केलेल्या हल्ल्यात इसीसचे दोन दहशतवादी ठार झाले होते. इराकी नॅशनल ऑर्गनाझेशनचे सिनिअर अधिकारी जबार अल मामोरी यांनी म्हटलंय.

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एक बॉम्बस्फोट केला, हा बॉम्ब चार वर्षाच्या मुलाला बांधण्यात आला होता. रिमोटकंट्रोलचं डिवाईसलावून या स्फोट करण्यात आला, ज्यामुळे या लहानग्याचं शरीर छिन्न विच्छीन्न झालं.