नवी दिल्ली : येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं.
वेश्याव्यवसाय करण्याचा या महिलेवर आरोप होता. अल कायदा शरीया कोर्टात तिला ही भयंकर शिक्षा देण्यात आली होती.
मिलिटरी इमारतीच्या मैदानावर मध्यभागी असलेल्या मोठ्या खड्यात या महिलेला उभं करण्यात आलं. त्यानंतर तिला दगडानं ठेचण्यात आलं. यावेळी, या भागातील इतर स्थानिकही उपस्थित होते.
शरीया कायद्यानुसार, एखाद्या विवाहीत पुरुषाला किंवा स्त्रीला अनैतिक शारीरिक संबंधांसाठी दगडानं ठेचून ठार करण्याची शिक्षा देण्यात येते.