कैरो : इसिसकडून पुन्हा रक्तपात घडवून आणण्यात आलाय. इजिप्तमधील २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्यात. याचा एक धक्कादायक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेची हिंसक कृत्ये सुरुच आहेत. रविवारी इसिसच्या ताब्यात असलेल्या इजिप्तमधील ख्रिश्चन नागरिकांची हत्या करण्यात आली. इसिसच्या या कृत्याची दखल घेत इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह एल-सिसी यांनी सुरक्षा प्रमुखांची बैठक बोलावली आहे.
इसिसने इराक आणि सीरियामध्ये हिंसक कारवाया सुरुच ठेवल्या आहेत. याचवेळी त्यांनी लिबियामध्ये हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. एका समुद्रकिनारी अपहृत २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केली आहे.
ख्रिश्चन नागरिकांचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लिबियातील सिरते शहरातून या सर्व नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. हे सर्व कामगार होते. तोंडाला मास्क घालून दहशतवाद्यांनी हे कृ्त्य केल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, इजिप्तच्या नागरिकांना लिबियामध्ये जाण्यास आम्ही बंदी घातली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.