नवी दिल्ली : आयसीस या दहशदवादी संघटनेमध्ये सेक्स गुलामच्या रुपात 3 महिने घालवणाऱ्या एका यजीदी तरुणीने त्यादरम्यान तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल जेव्हा युएनएससी मध्ये सांगितलं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.
व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी
आयसीस या संघटनेतील दहशदवाद्यांनी २१ वर्षीय तरुणीवर खूप अमानूषपणे क्रुर अत्याचार केलेत. तिने सांगितलं की 'हे दहशदवादी महिलांवर आणि तरुणींवर खूप अमानूषपणे बलात्कार करतात. या यातना अतक्या भयानक असतात की त्यानंतर महिला सामान्य जीवन जगूच शकत नाही. '
नाडियाचं 2014 मध्ये तिचाच गावातून अपहरण करण्यात आलं होतं.