www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पेराल तसे उगवेल ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल... ही म्हण शेजारी देश पाकिस्तानला तंतोतंत लागू पडतेय. कारण पाकिस्तानची राजधानी असलेलं 'इस्लामाबाद' हे शहर सगळ्यात धोकादायक शहर असल्याचा रिपोर्ट खुद्द पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानचं दिलाय.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद... 'सगळ्यात धोकादायक शहर'... खुद्द पाक सरकारच्या गृहमंत्रालयानंच हा रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टनुसार इस्लाबादमध्ये, अलकायदा, तहरिक-ए-तालिबान आणि लष्कर-ए-जाहन्वीसारख्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल कार्यरत आहेत. त्या संघटनांपासून शहराला धोका निर्माण झालाय. इस्लामाबादला 'हाय रिस्क सिटी' असल्याचं सांगत गेल्या काही दिवसांत शहरातली परिस्थिती आणखी खराब झाल्याचं झाल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
इस्लामाबादमध्ये गेल्या साह महिन्यात सर्वाधिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. याच शहरात दहशतवाद्यांचं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय. याशिवाय मोठ्या संख्येत हत्यारं आणि दारुगोळाही या शहरातून जप्त करण्यात आलंय.
याच पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. रावळपिंडी ब्लास्टनंतर इस्लामाबादला आठवडाभर अलर्टवर ठेवण्यात आलं होतं. एम्बसी आणि हायकमीशनची सुरक्षा वाढवण्यात आली. नागरिकांनाही समूहानं एकत्र न येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पाक गृहमंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये दूसरे प्रांत आणि शहरांबाबतही अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय तपास यंत्रणेवरही या रिपोर्टमध्ये बोट ठेवण्यात आलंय. मात्र, या रिपोर्टमुळे जैसे करनी, वैसे भरनी ही म्हण पाकसाठी लागू पडतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.