गावात २८ वर्षांनी हलला पाळणा

रोम : उत्तर इटलीतील ओसटाना नावाच्या एका लहानशा गावात तब्बल २८ वर्षांनी एका बाळाचा जन्म झाला आहे.

Updated: Jan 30, 2016, 11:56 AM IST
गावात २८ वर्षांनी हलला पाळणा title=

रोम : उत्तर इटलीतील ओसटाना नावाच्या एका लहानशा गावात तब्बल २८ वर्षांनी एका बाळाचा जन्म झाला आहे. गेल्या आठवड्यात तुरिन इस्पितळात या बाळाचा जन्म झाला. पाबलो असं त्याचं नामकरण करण्यात आलंय. 

या बाळाच्या आगमनामुळे आता गावात मोठा जल्लोष साजरा होतोय. आटा गावाच्या वेशीवर एका करकोच्याचे शिल्प उभारण्यात आले आहे. या करकोच्याच्या चोचीत एका निळ्या कपड्यात एक बाळ दिसतंय.  

या गावासाठी बाळाचा जन्म ही खूप मोठी घटना आहे. गेल्या १०० वर्षांत या गावाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर खासकरुन अनेक जण हे गाव सोडून इतरत्र स्थायिक झाले आहेत. १९७२ ते १९८७ मध्ये या गावात फक्त १७ बाळांचा जन्म झालाय, हे विशेष.

आता लोक इथे रहावेत यासाठी इथल्या काऊन्सिलने लोकांना रोजगारात आणि उद्योग धंद्यात करसवलतीसारख्या अनेक सवलती दिल्या आहेत. पाबलोचे कुटुंबीयसुद्धा याच कारणामुळे या गावात राहिले. इटलीत अनेक गावांत लोकसंख्या घटण्याची समस्या आहे.