जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!

कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

Updated: Aug 12, 2014, 03:08 PM IST
जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

जपानच्या सेनेसमोर शरणागती पत्करलेल्या हजारो भारतीय जवानांना अमानवीय अशा छळाला सामोरं जावं लागलं... जिवंत सैनिकांचा वापर ‘टार्गेट प्रॅक्टीस’साठी करण्यात आला. गोळ्या घातल्यानंतरही ज्या सैनिकांचा प्राण गेला नव्हता अशा सैनिकांना चाकूनं भोसकून ठार करण्यात आलं.  

हा खुलासा त्याकाळी ‘रॉयटर्स’च्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं आपल्या न्यूज एजन्सीला पाठवलेल्या संदेशात केला होता. 2 एप्रिल 1946 रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये रॉयटर्सच्या पत्रकारानं एक छोटा संदेश पाठवला होता. हा संदेश अनेक वर्तमानपत्रांची हेडलाईन बनला होता. 

‘जपानी लेफ्टनंट हिसाता तोमियासू याला 1944 मध्ये ‘न्यू गुयाना’च्या ‘वेवेक’मध्ये 14 भारतीय सैनिकांच्या हत्येसाठी आणि त्यांना आपलं भोजन बनवण्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय’ असं या संदेशात म्हटलं होतं.  

जपानी सैन्यानं 15 फेब्रुवारी 1942 रोजी सिंगापूरवर ताबा मिळवल्यानंतर भारतीय सेनेच्या 40 हजार सैनिकांना बंदी बनवलं होतं. यातील जवळपास 30 हजार जण ‘आयएनए’मध्ये सहभागी झाले होते. ज्या सैनिकांनी ‘आयएनए’मध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला त्यांच्यासोबत जपानी सेनेनं कॅम्पमध्ये क्रूरतेची हद्द ओलांडली. अशा युद्ध कैद्यांना बटाविया म्हणजेच आत्ता जकार्ताच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यांचा अत्यंत अमानवी आणि क्रूर पद्धतीनं छळ करून जखमी अवस्थेत न्यू गुआना, न्यू ब्रिटनसाठी रवाना करण्यात आलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.