गणिताच्या पुस्तकात छापला पॉर्न स्टारचा फोटो

थायलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. झालं असं की, गणिताच्या पुस्तकात जपानच्या पॉर्न स्टारचा फोटो चुकून छापला गेलाय. तो सुद्धा कव्हर पेजवर..

Updated: Sep 18, 2014, 04:29 PM IST
गणिताच्या पुस्तकात छापला पॉर्न स्टारचा फोटो title=

थायलंड: थायलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. झालं असं की, गणिताच्या पुस्तकात जपानच्या पॉर्न स्टारचा फोटो चुकून छापला गेलाय. तो सुद्धा कव्हर पेजवर..

‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ नावाच्या गणिताच्या पुस्ताकाच्या कव्हर पेजवर जपानी पॉर्न स्टार माना अओकी गणिताचं पुस्तक वाचतेय, असा फोटो छापला गेला. हे पुस्तक थायलंडच्या शालेय अभ्यासक्रमात सहभागी आहे.  

हे पुस्तक प्रिंटसाठी गेलं होतं. मात्र या भयंकर चुकीची माहिती मिळताच लगेच बाजारातून पुस्तकाच्या प्रती मागविण्यात आल्या.  

पुस्तकाच्या प्रकाशकानं या चुकीची क्षमा मागितली. रिपोर्टनुसार 10 विद्यापीठांमध्ये पाठवल्या गेलेल्या 3 हजार प्रिंट वापस मागवल्या गेल्या. आश्चर्य म्हणजे पुस्तकाच्या इतक्या प्रिंट छापेपर्यंत कशी कोणालाच ही चूक कळली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.