भारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे.  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्‍वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे. 

Updated: Sep 18, 2014, 02:44 PM IST
भारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा title=

मुंबई : तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे.  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्‍वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे. 

दोन्ही देश या उदय पावणाऱ्या महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था असून परस्पर संबंध बळकट असल्याचा फायदा दोन्ही देशांना व उर्वरित आशियास होणार असल्याचे लामा यांनी यावेळी सांगितले. 

शी जीनपिंग हे वास्तवादी, ते भारताकडून अधिक शिकू शकतील
याचबरोबर तिबेटच्या जुन्या समस्येविषयीही लामा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तिबेटची समस्या ही भारताचीही समस्या असून ही वस्तुस्थिती समजावून घेणे ही काळाची गरज असल्याचे लामा यांनी यावेळी सांगितले. ""याआधी, मी हु जिंताओ यांना, ते भारताकडून काही चांगल्या गोष्टी शिकू शकतात, असे सांगितले होते. यावेळीही मी तेच सांगेन. 

शी जिनपिंग हे अधिक वास्तववादी आहेत आणि हु यांच्यापेक्षा ते अधिक व्यापक मनाचे आहेत. ते भारताकडून अधिक शिकू शकतील. चीन व भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड आहे. मात्र भारत हा विविधता असलेला लोकशाहीवादी देश आहे,‘‘ असे लामा म्हणाले. 

याचबरोबर, तिबेटचा प्रश्‍न हा शांतिपूर्वकच सोडविला गेला पाहिजे, अशी भावना लामा यांनी यावेळी व्यक्त केली. ""तिबेटचा प्रश्‍न शांततापूर्वक सोडविला जाणे फार आवश्‍यक आहे. बळाच्या वापराने काहीही साध्य होणार नाही,‘‘ असे लामा यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.