नवी दिल्ली : भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी, नोबेल विजेत्यांना, नोबेल पदक, नोबेल डिप्लोमा आणि पुरस्कार राशीचं पत्र दिलं जाईल.
बालहक्क आणि शिक्षण यांसाठी भारताने केलेल्या प्रयत्नात भारताच्या प्रगतीचं मूळ दडलंय असे गौरवोदगार मलाला युसूफझाईने काढले. मुलांना आयपॅड नकोय त्यांना पुस्तकाची गरज आहे असं ती म्हणाली. ऑस्लोमध्ये मलाला युसूफझाई आणि कैलाश सत्यार्थी यांची पत्रकार परिषद झाली.
या पुरस्कार सोहळ्यासाठी सत्याथी पत्नी सुमेधा, मुलगा, सून आणि मुलगी यांच्यासोबत कालच ओस्लोमध्ये दाखल झालेत. जगात अनेक ठिकाणी युद्धसदृष स्थिती आहे. तिथे सर्वाधिक लहान मुलं भरडली जात आहेत, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची गरज सत्यार्थींनी व्यक्त केली.
तसंच, भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय. झी मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मलालानं शिक्षण आणि बालहक्कांबाबत आपली मतं विस्तारानं मांडली.
व्हिडिओ पाहा :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.