www.24taas.com, पट्टाया, थायलंड
थायलंडच्या पट्टायामध्ये `किसॅथॉन ` ही दीर्घ चुंबन स्पर्धा सुरु झालीय. `गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड` मधील रेकॉर्ड मोडित काढण्यासाठी नऊ जोडप्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय. या जोडप्यांचे ‘व्हॅलेंटाईन डे’पर्यंत किस करण्याचे टार्गेट आहे. जिंकण्याऱ्या जोडीला डायमंड रिंग आणि साडे सहा हजार अमेरिकी डॉलर बक्षिस रुपात मिळणार आहे. यापूर्वीचा रेकॉर्ड ५० तास २५ मिनिट आणि एका सेंकदाचा आहे.
पट्टायामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त दीर्घ चुंबन स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेचे नियमही गंमतशीर... स्पर्धेत उतरलेल्या जोडप्यांना पाणी, कॉफी, दूध किंवा सरबत पिण्यास परवानगी होती पण त्यासाठी ओठावर असलेले ओठ वेगळे करण्यास मनाई आहे. एवढेच नाही तर नैसर्गिक विधीही त्यांना एकमेकांसोबतच आणि कॅमेऱ्याच्या नजरकैदेतच आटोपण्याचं बंधन... तसंच या दरम्यान बसायचे किंवा झोपायचे नाही असाही नियम आहे. त्यामुळे ही ‘किसिंग कॉम्पिटिशन’स्पर्धकांचा किस पाडणार हे नक्की!
२०१२ साली याच `किसॅथॉन ` या चुंबनस्पर्धेत एकचाया आणि लक्साना या थायी जोडप्यानं ही स्पर्धा जिंकली होती.