प्रेमी कपल्ससाठी येतंय नवं अॅप्लिकेशन

मधू इथे आणि चंद्र तिथे. अशी अनेकदा प्रेमी युगुलांची अवस्था असते. एकमेकांपासून लांब असलेल्या लर्व्हबर्डसनी मग आधार घेतला तो एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, वेब कॅम अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा. त्यामधून रिअल टाइममध्ये एकमेकांशी गप्पा मारता येत असल्या आणि एकमेकांचं दर्शन होत असलं तरी भावभावनांचा ओलावा जाणवत नव्हता. पण आता ती अडचणही लवकरच दूर होणार आहे. कारण प्रेमी कपल्ससाठी किसिंजर नावाचं नवं अॅप्लिकेशन लवकरच येणार आहे. त्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीनं प्रियकराला आपल्या प्रेयसीला कीसही पाठवण्यात येणार आहे.

Updated: Dec 21, 2016, 11:35 PM IST
प्रेमी कपल्ससाठी येतंय नवं अॅप्लिकेशन title=

मुंबई : मधू इथे आणि चंद्र तिथे. अशी अनेकदा प्रेमी युगुलांची अवस्था असते. एकमेकांपासून लांब असलेल्या लर्व्हबर्डसनी मग आधार घेतला तो एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, वेब कॅम अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा. त्यामधून रिअल टाइममध्ये एकमेकांशी गप्पा मारता येत असल्या आणि एकमेकांचं दर्शन होत असलं तरी भावभावनांचा ओलावा जाणवत नव्हता. पण आता ती अडचणही लवकरच दूर होणार आहे. कारण प्रेमी कपल्ससाठी किसिंजर नावाचं नवं अॅप्लिकेशन लवकरच येणार आहे. त्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीनं प्रियकराला आपल्या प्रेयसीला कीसही पाठवण्यात येणार आहे.

एका प्लास्टिक पॅडला आपण ओठांनी कीस करायचं आणि त्या भावना एप्लिकेशनच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पाठवायच्या. म्हणजे तो कीस जगात कुणालाही पाठवता येईल. लंडन विद्यापीठात त्याबाबत संशोधन सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर यापुढं कुणालाही आपल्या लाडक्या व्यक्तीला फ्लाईंग कीस देण्याची गरज भासणार नाही.