पिझ्झामुळं वाचले महिला आणि तिच्या मुलांचे प्राण

आपणही हैराण व्हाल पिझ्झामुळं कुणाचा जीव कसा काय वाचू शकतो. पण हे सत्य आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं महिलेनं पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करून आपला आणि आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला.

Updated: May 7, 2015, 06:10 PM IST
पिझ्झामुळं वाचले महिला आणि तिच्या मुलांचे प्राण  title=
प्रातिनिधिक फोटो

फ्लोरिडा, अमेरिका: आपणही हैराण व्हाल पिझ्झामुळं कुणाचा जीव कसा काय वाचू शकतो. पण हे सत्य आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं महिलेनं पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करून आपला आणि आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला.

हे आश्चर्यकारक प्रकरण सोमवारचं आहे. जेव्हा 28 वर्षीय शॅरिल ट्रेडवेला तिचा आधीचा मित्र असलेल्या इथॉन निकरसननं तीन मुलांसह घरात चाकूच्या धाकावर बंदी बनवून ठेवलं होतं. शॅरिलचे मुलं भूकेमुळं व्याकुळ झाले होते. तेव्हा तिनं इथॉनकडे स्वयंपाक करण्याची मागणी केली. इथॉननं तिला स्वयंपाक करण्यास नकार दिला, पण तिच्या आयुष्यातील अखेरचा पिझ्झा मागविण्याला परवानगी दिली. त्यासाठी त्यानं मोबाईलही दिला. 

शॅरिलनं प्रसंगावधान राखत पिझ्झा कंपनीच्या अॅपवरून ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, 'प्लीज हेल्प. गेट 911 टू मी'. म्हणजे माझी मदत करा आणि माझ्यापर्यंत 911ला पोहोचवा. 911 अमेरिकेत नॅशनल हेल्पलाइन नंबर आहे. शॅरिलनं खूप चलाखीनं कमेंट लिहिली जी इथॉनला कळलीही नाही. 

पिझ्झा हटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचा संदेश पाहताच तो पोलिसांपर्यंत पोहोचवला आणि पोलीसही लगेच तिच्या घरी पोहोचले. पोलिसांनी तब्बल 20 मिनीटं इथॉनसोबत वाद घातला आणि त्यानंतर इथॉननं सरेंडर केलं. पिझ्झा हट रेस्टॉरंटचे कँडी हॅमिल्टननं सांगितलं, की इथं काम करून त्याला 28 वर्ष झालेत. मात्र असं प्रकरण कधी पाहिलं नव्हतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.