मायकेल जॅक्सनची २० प्रकरणं दडपण्यासाठी, २० कोटी लाच

सुप्रसिद्ध पॉप सिंगर आणि डान्सर मायकेल जॅक्सनला २० प्रकरणं दडपण्यासाठी  २० कोटींची लाच द्यावी लागली, असा आरोप मायकेल जॅक्सनवर केला जातोय. मायकल जॅक्सनने कथित लैंगिक छळांची तब्बल २० प्रकरणे दडपण्यासाठी, सुमारे २० कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा पीडितांच्या वकिलांनी केला आहे.

Updated: Apr 6, 2015, 06:49 PM IST
 मायकेल जॅक्सनची २० प्रकरणं दडपण्यासाठी, २० कोटी लाच title=

लंडन : सुप्रसिद्ध पॉप सिंगर आणि डान्सर मायकेल जॅक्सनला २० प्रकरणं दडपण्यासाठी  २० कोटींची लाच द्यावी लागली, असा आरोप मायकेल जॅक्सनवर केला जातोय. मायकल जॅक्सनने कथित लैंगिक छळांची तब्बल २० प्रकरणे दडपण्यासाठी, सुमारे २० कोटी रुपयांची लाच दिल्याचा दावा पीडितांच्या वकिलांनी केला आहे.

यासंदर्भात संपत्तीसाठीचा दावा दाखल करता येईल किंवा नाही, याचा निर्णय लॉस एंजिलिसच्या वरिष्ठ न्यायालय लवकरच देणार आहे. वेड रॉब्सन आणि जेम्स सेफचक हे पीडित त्याच्या संपत्तीवर दावा सांगत आहेत.

'मी नऊ वर्षांचा असताना मायकेल जॅक्सनने माझा लैंगिक छळ केला, आणि माझ्या वडिलांना दहा लाख डॉलर्स देऊन गप्प केले. तसेच, जॅक्सनने एक खाजगी विवाह समारंभ आयोजित करून त्यामध्ये मला वधू बनविले होते,' असे सेफचक याने सांगितले.

दरम्यान, रॉब्सन याने जॅक्सनवरील खटल्याच्या सुनावणीदरम्यान २००५ मध्ये सांगतिले होते की, त्याच्याशी जॅक्सनने संबंध ठेवले होते, मात्र त्याने ते सहन करून तो २२ वर्षे गप्प बसला.

जॅक्सनने आपल्यावरील विनयभंगाचे आरोप फेटाळून लावले होते, परंतु त्याने केलेल्या कथित लैंगिक छळाचा पहिला पीडित जॉर्डन शँडलर याच्या कुटुंबीयांना चार कोटी डॉलर्स दिले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.