नवी दिल्ली : देशातील डाळींच्या भडकत्या किमतींना रोखण्याच्या हेतूने केंद्र सरकारने उपाय करण्याचं ठरवलं आहे. देशांतर्गत मागणी अबाधित राहण्यासाठी सप्टेंबरपासून म्यानमार आणि अन्य देशांकडून ५ हजार टन उडीद डाळ आयात करण्यासाठी निविदा प्रसिद्धीस दिली आहे.
एमएमटीसी या सरकारी यंत्रणेने ५ हजार टन उडीद डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविली आहे. डाळींच्या आयातीसाठी एमएमटीसीने प्रसिद्धीस दिलेली ही दुसरी निविदा आहे. याआधी ५ हजार टन तुरीच्या डाळीच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. पीक वर्ष २०१४-२०१५मध्ये डाळींचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.