वॉलेटा : माल्टामध्ये लिबियचं विमान अपहरण करणाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेसमोर आत्मसमर्पण केलंय. या पॅसेंजर विमानातून सर्व ११८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.
लिबियाच्या साबहा इथून ए ३२० या विमानानं उड्डान घेतलं होतं. राजधानी त्रिपोलीला हे विमान जाणार होतं.
अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी या विमानाला माल्टाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं होतं. या विमानात २८ महिला आणि एक लहान मुलं आणि ८२ पुरुषांचा समावेश होता.
माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी विमानातील सर्व प्रवाशांची तसंच पायलटची सुखरुप सुटका झाल्याच्या आणि अपहरणकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. अपहरणकर्त्यांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.