www.24taas.com,वृत्तसंस्था, नॉबसिन
उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.
कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी न घेता ही मुलं सोनं शोधत आहेत. किती तरी मुलं सोनं शोधण्याच्या हव्यासापोटी आपला जीम गमावून बसले आहेत. हे काम करण्यासाठी ही मुलं २० ते ३० मीटर खोल सुरंग खोदून खड्डांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून उतरतात. आत उतरलेले मुलं जेव्हा दगड फोडण्यासाठी स्फोट करतात, त्याचा आवाज बाहेरपर्यंत येतो. सुरंगच्या आता फुटलेल्या दगडांच्या तुकड्यांना बाहेर काढलं जातं. ज्यात टीममधले इतर मुलं सोनं आहे का तपासतात.
मिळालेल्या माहितीनुसार गावात शेती आणि इतर काम करण्यासाठी त्यांना मजुरी मिळत नाही. म्हणूनच हे बेकायदेशीरपणे आपला जीव धोक्यात घालून पैसे कमवतायेत. इथं काम करणाऱ्या मुलांचं म्हणणं आहे की, गावातील इतर काम करण्यापेक्षा सोनं शोधण्याचं काम करणं चांगलं आहे. कारण दिवसभर शेतात काम करुनही त्यांना काही मोबदला मिळत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.