टोरंटो : कॅनडामध्ये एका डोकेफिरू प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले... इतकंच नाही तर त्यानं हे मांसाचे तुकडे शाळा आणि राजकीय पक्षांना धाडले... या क्रूर व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
‘पॉर्न’ अभिनेता म्हणून ओळख असलेल्या ल्युका मॅगनोटा याला न्यायाधिशांनी त्याची प्रेयसी जून लिन हिच्या हत्येमध्ये दोषी करार दिलं. लिन हिची हत्या २०१२ मध्ये झाली होती. आठ दिवस चाललेल्या सुनावणीनंतर मॅगनोटा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २५ वर्षांनंतर त्याला पेरॉलवर सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
मॅगनोटो याचे वकील ल्यूक लेक्लेअर यांच्या म्हणण्यानुसार, त्यानं शिक्षेच्या निर्णयाचा स्वीकार केलाय. तसंही गेल्या अनेक दिवसांपासून तो या दिवसासाठी स्वत:ची तयारी करत होता. आता, तो पुन्हा एकदा नव्याने आपलं जीवन सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
लेक्लेअर यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी आणखी ३० दिवसांचा वेळ आहे... तो याबद्दल विचार करेल. सुनावणी दरम्यान मॅगनोटानं पहिल्यांदा स्वत: निरपराध असल्याचं सांगितलं होतं... पण, नंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.