बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...

योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

Updated: Mar 24, 2016, 10:16 AM IST
बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...   title=

न्यूयॉर्क : योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

बोस्टन, पॅरिस आणि ब्रसेल्स या तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळी बॉम्बस्फोट झाले... आणि या तिनही वेळी १९ वर्षांचा मॅसन वेल्स हा तरुण बॉम्बस्फोट झाला त्याच्या आसपासच्याच भागात उपस्थित होता... पण, तो दहशतवादी नाही.

मॅसन यूएसच्या उताहमध्ये राहतो. निव्वळ योगायोग म्हणून तो तिनही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातून अगदी थोडक्यासाठी बचावलाय. नुकत्याच ब्रसेल्समध्ये झालेल्या हल्ल्यात तो जखमीही झालाय. डोक्याला, हाता - पायाला गंभीर जखमा झाल्यात... पण, आपल्या मुलाचा जीव वाचला म्हणून त्याच्या वडिलांना मात्र हायसं वाटतंय. 

ब्रसेल्स हल्ला - मार्च २०१६

मंगळवारी ब्रसेल्सच्या झवेन्टम एअरपोर्टवर डिपार्चरसाठी मॅसन वाट पाहत होता तेव्हाच बॉम्बस्फोट झाला. यात मॅसनच्या 

पॅरिस हल्ला - नोव्हेंबर २०१५

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पॅरिस हल्ल्याच्या वेळी तो शहरातच होता. सुदैवाने घटनास्थळापासून लांब असल्यामुळे त्याला दुखापत झाली नाही.

बोस्टन हल्ला - एप्रिल २०१३

बोस्टनमध्ये एप्रिल महिन्यात दहशतवाद्यांनी मृत्यूची होळी खेळली होती. या ठिकाणी झालेल्या बॉम्ब हल्ल्यातही मॅसन थोडक्यात वाचला. मॅसनची आई मॅरेथॉनसाठी आली होती. त्यावेळी तो वडिलांसोबत होता आणि त्यांच्यापासून काही अंतरावरच प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटातून दोघंही सुखरुप बचावले.