बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 18, 2014, 02:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वॉलालंपूर
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळले, अस सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
मलेशियन एअरलाइन्सचं बोइंग विमान दहा दिवस उलटून गेल्यानंतरही सापडलेलं नाही. आता हे विमान तालिबान्यांचं नियंत्रण असलेल्या अफगणिस्तानातल्या एखाद्या दुर्गम प्रदेशात उतरवण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. हे प्रवासी सुरक्षित असतील अशी आशा मलेशियन सरकारनं व्यक्त केलीय. या विमानात चार मराठी प्रवाशी होते. त्यांच्या कुटुंबियांसी संपर्क साधून तपासासाबाबत माहिती देण्यात आल्याचं मलेशियानं स्पष्ट केलं आहे.
मार्चपासून बेपत्ता असलेल्या या विमानाचा शोध सुरू आहे. विमानाच्या बेपत्ता होण्यामागील कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. त्यातच आता हे विमान तालिबान्यांचे नियंत्रण असलेल्या दक्षिण अफगाणिस्तानातील अतिदुर्गम भागात नेण्यात आले असावे, संशय आहे. दरम्यान, मात्र ज्या प्रदेशातून अपघाताचे संकेत मिळाले त्या प्रदेशात केलेल्या पाहणीत काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे तपास करणा-या संस्थांना विमानाचं अपहरण झाल्याचा संशय असून विमानातल्या २३९ प्रवाशांच्या जीवाच्या बदल्यात मोठी डील करण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलंय.
तपासामध्ये विमानाची रडार यंत्रणा कुणीतरी जाणूनबुजून बंद केली असल्याचं समोर आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसंच बेपत्ता झालेलं विमान रडारला टाळण्यासाठी ५ हजार फूट किंवा त्यापेक्षाही खालच्या उंचीवर आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते हवेतच माघारी फिरून वळवण्यात आलं असल्याचंही मलेशियाच्या अधिका-यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मलेशियाच्या पंतप्रधानांनी आता अफगाणिस्तानच्या तालिबानी प्रदेशात विमानाचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितलीय. विमानाचं अपहरण करून तालिबानी प्रदेशात ठेवलं असल्याचा संशय आहे.
सॅटेलाईटच्या माहितीनुसार विमान थायलंड आणि कझाकिस्तानमध्ये उडालं होतं. ८ मार्चला क्वॉलालंपूर या विमानानं बीजिंगकडे उड्डाण घेतलं. त्यानंतर केवळ दोन तासांत हे विमान बेपत्ता झालं. अशा पद्धतीनं पूर्ण तयारी करून, योजना आखून विमान बेपत्ता करण्याचं काम एकतर वैमानिक करू शकतात किंवा ज्याला विमानाबाबत संपूर्ण माहिती असणाराच हे कृत्य करु शकतो. त्यामुळं या विमानाचं कुणी आणि काय केलं याचं हे गूढ अजूनही कायम आहे
विमान आठ तास रडार क्षेत्राच्या बाहेर होते. तीन देशांतील रडार्सना चुकवून ते उडत होते. कमी उंचीवरून विमान उडत असेल तर ते रडारवर दिसत नाही, त्याला टेरेन मास्किंग म्हणतात, तसा प्रकार या विमानाच्या बाबतीत करण्यात आला असावा. वैमानिकाला हवाइ्र वाहतुकीचे उत्तम ज्ञान होते, असे `न्यू स्ट्रेट्स टाइम्स`च्या वृत्तात म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.