बेपत्ता विमान

Seven Remaining Bodies Recovered From AN 32 Aircraft Crash In Mountains PT1M48S

अरुणाचल प्रदेश । बेपत्ता वायू सेनेच्या विमानातील आणखी सात जणांचे मृतदेह हाती

अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता वायू सेनेच्या विमानातील आणखी सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Jun 20, 2019, 01:25 PM IST

बेपत्ता विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाजही आता बेपत्ता

8 मार्च 2014 पासून बेपत्ता असलेल्या विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाज देखील गायब झालं आहे.

Feb 7, 2018, 04:26 PM IST

एअर एशिया : बेपत्ता विमानातील ४० मृतदेह समुद्रातून काढले

 एअर एशियाचे बेपत्ता विमान क्यूझेड ८५०१ चा ढिगारा मंगळवारी तपासणी दरम्यान सापडला. इंडोनेशिया नागरी उड्डान महानिदेशक दजोको मुर्जतमोदजो यांनी दिलेल्या माहितीनुसार हे निश्चित झाले आहे की हे एअर एशियाचे विमान आहे आणि परिवहन मंत्री पनगकलां बून रवाना होणार आहे. 

Dec 30, 2014, 04:24 PM IST

एअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त, समुद्रात कोसळल्याची शक्यता

एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Dec 29, 2014, 10:27 AM IST

`त्या` सहवैमानिकानं कुणाला केला होता संपर्क?

मलेशियन एअरलाइन्सचे `एमएच ३७०` हे विमान अचानकपणे गायब होण्याचे गूढ संपता संपत नाहीए.

Apr 12, 2014, 04:23 PM IST

मलेशिया बेपत्ता विमान: काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले

एका `पिंगर लोकेटर`नं विमानाच्या `ब्लॅक बॉक्स`मधून निघणाऱ्या सिग्नलशी जुळणारा एक संकेत शोधून काढलाय. ज्यातून चीनला जाताना अचानक बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झालीय.

Apr 7, 2014, 06:52 PM IST

बेपत्ता विमानाचा अजुनही शोध सुरूच

मलेशियाच्या गेल्या आठ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध अजुनही सुरूच आहे. रशियन विमानाने हिंदी महासागराच्या नवीन भागात विमानाचा शोध सुरू केला आहे.

Mar 30, 2014, 04:58 PM IST

बेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज

बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.

Mar 28, 2014, 03:41 PM IST

हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?

आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.

Mar 24, 2014, 09:15 AM IST

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.

Mar 18, 2014, 09:45 AM IST

बेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.

Mar 17, 2014, 09:31 AM IST

‘ऑल राइट, गुड नाइट’ हेच वैमानिकाचे अखेरचे शब्द!

‘ऑल राइट, गुड नाइट’ असे शब्द व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ इथल्या विमानतळ अधिकार्‍यांच्या कानावर पडले आणि काही क्षणांतच विमान रडारवरून नाहीसे झाले आणि अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली.

Mar 13, 2014, 12:30 PM IST

'त्या' बेपत्ता विमानाचे सॅटेलाईट फोटो जाहीर...

चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Mar 13, 2014, 09:33 AM IST