लंडन : मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध सुरू आहे. पण त्या दरम्यान काही फोटो समोर आले आहे, ते पाहून तुम्हांला धक्का बसू शकतो.
आतापर्यंत मंगळावर पाणी सापडले तसेच एक महिलेची आकृती दिसली होती. आता नासाच्या क्युरिओसिटी उपग्रहाने पाठवलेल्या फोटोंमध्ये खड्डयात उड्या मारणारा उंदीर आणि माकडासारखी प्रतिकृती दिसते आहे. नासाकडून हा उपग्रह २०१२मध्ये अंतराळात पाठविण्यात आला होता.
या उपग्रहाने पाठविलेल्या फोटोच्या माध्यमातून इतर गोष्टीही दिसल्या आहेत. नासाच्या फोटोचे विश्लेषण करणारे खगोलशास्त्रज्ञ जोए व्हाइटने नासाच्या या फोटोंमध्ये उड्या मारणारा उंदीर शोधून काढला. हा उंदीर दोन ते तीन फुटाचा असू शकतो. त्याचे कान, नाक आणि डोळे स्पष्टपणे दिसत आहे.
तर विश्लेषकांच्यामते एक माकड एका टेकडीवर बसला आहे. त्याची लांब शेपूट आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार व्हाइट यांनी २८ ऑक्टोबरला कॅमेऱ्यात कैद केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.