या ठिकाणी माणूस गेला, पण परत आलाच नाही

फिरण्यासाठी जगभरात एका पेक्षा एक चांगली अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत

Updated: Jun 17, 2016, 10:01 PM IST
या ठिकाणी माणूस गेला, पण परत आलाच नाही title=

मुंबई: फिरण्यासाठी जगभरात एका पेक्षा एक चांगली अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत. हौशी पर्यटकही भयानक ठिकाणी जाणं पसंत करतात. पण या भयानक आणि खतरनाक ठिकाणांवरून असे पर्यटक परत आलेच नाहीत. कोणत्या आहेत या जागा पाहूयात.

मिशिगन ट्रँगल

बरमुडा ट्रँगलच्या उत्तरेला मिशिगन ट्रँगल आहे. 1891 साली थॉमस ह्यूम आणि त्यांचे साथीदार मिशिगन ट्रँगलवर गेले आणि गायब झाले. त्यानंतर 1921 मध्ये याठिकाणी एक जहाज नजरेस पडलं होतं, पण त्या जहाजात असलेल्या 11 प्रवाशांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. 

लेक सुपिरियर

उत्तर अमेरिकेत असलेला हा तलाव जगभरातल्या धोकादायक तलावांपैकी एक आहे. या तलावामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. 20 पेक्षा जास्त जहाज या तलावातून गायब झाली आहे. यातल्या काही जहाजांचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. या तलावात येणाऱ्या लाटा 30 फूट उंचीपर्यंत जातात. या लाटांच जहाज गायब होण्याचं कारण असल्याचं मानलं जातं.

हाय वे 16

कॅनडा आणि ब्रिटीश कोलंबियामध्ये असलेल्या या हाय वे वरूनही अनेक जण गायब झाले आहेत. या हायवेवरून एकाच वेळी 18 महिला गायब झाल्या होत्या. 1975 मध्ये मोनिका इगनास ही महिला या ठिकाणावरुन गायब झाली होती. 

गायब झाल्यानंतर तिचा मृतदेह एका सुनसान ठिकाणी मिळाला होता. पण या हाय वे वरून गायब झालेल्या इतर महिलांचा मात्र अजूनही शोध लागला नाही. 

बरमुडा ट्रँगल

बरमुडा ट्रँगल ही जगातली सगळ्यात खतरनाक जागा आहे. 12 पेक्षा जास्त जहाज आणि विमानं या ठिकाणी आल्यावर पुन्हा कधीच दिसली नाहीत. यापैकी फ्लाईट-19 बाबत सगळ्यात जास्त चर्चा झाली. 

5 डिसेंबर 1945 ला युएस नेव्हीचे ऑफिसर आपल्या नियमित प्रशिक्षणासाठी गेले असता गायब झाले. हे विमान चार्ल्स टेलर चालवत होते. चार्ल्स हे रेडिओवरून संपर्कात होते, पण अचानक त्यांच्याशी संपर्क तुटला आणि विमान गायब झालं. 

या विमानाच्या शोधासाठी गेलेलं दुसरं विमानही कधीच परतलं नाही.

बेनिंगटन ट्रँगल

वेरमोंटच्या दक्षिेणेला असलेली ही जागा जगातल्या सगळ्यात धोकादायक पैकी एक आहे. सगळ्यात शेवटी 1945 ते 1950 या काळामध्ये या ठिकाणी पाच जणांना पाहण्यात आलं होतं. 

सगळ्यात आधी 18 वर्षांची महिला हायकर दोन व्यक्तींबरोबर गायब झाली. या घटनेच्या 3 दिवसांनंतर आणखी एक माणूस गायब झाला. या सगळ्यांचा आजही शोध लागला नाही. 

अमेरिकेचं नॅशनल पार्क

84 मिलियन एकर परिसरात हे नॅशनल पार्क पसरलं आहे. चारही बाजूनं जंगल असलेल्या या भागामध्ये गेलेला एकही माणूस परत आला नाही. या नॅशनल पार्कमधल्या रहस्यावर डेव्ड पॉलीडेस यांनी मिसिंग 411 नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात जवळपास 1100 लोकांच्या गायब होण्याची मागिती देण्यात आली आहे.