www.24taas.com
तिसऱ्यांदा निवडून आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या निवडणुकीच्या विजयाचे वृत्त बड्या वृत्तपत्रांनी मुख्य बातमी म्हणून प्रसिद्ध केली. या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर ठळक मथळा देऊन जगाला मोदींच्या या विजयाची ओळख करून दिली.
बीबीसी न्यूज
भारतीय मीडियामध्ये कट्टर हिंदुत्ववादी नेते नरेंद्र मोदी यांची चर्चा आहे. राष्ट्रीय राजकारणात मोदींनी आपली पकड मजबूत केली आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून राष्ट्रीय राजकारणात आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी मोदी हे प्रमुख दावेदार आहेत.
द डॉन (पाकिस्तानमधील वृत्तपत्र)
विवादास्पद हिंदुत्ववादी नेते नरेंद्र मोदी यांनी भारतातील गुजरात राज्याची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली आहे. २०१४ च्या पंतप्रधान म्हणून मोदी यांचं नाव चर्चेत आहे. गुजरातमधील नागरिकांनी मोदींवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.
बांग्लादेश न्यूज २४ तास
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची चौथी टर्म पटकावली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. पंतप्रधान पदासाठी महत्त्वाकांक्षी असणारे आणि प्रचंड चर्चेत असणारे मोदी हे मात्र चांगलेच विवादास्पद देखील राहिले आहेत.
द गार्डियन
गुजरातचे विभाजनकारी असे नेते नरेंद्र मोदी हे महत्त्वाच्या ठरलेल्या निवडणुकीत विजय मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या विजयाने त्यांनी दाखवून दिलं आहे की त्यांची ‘पॉवर’ काय आहे. त्यात त्यांनी राष्ट्रीय राजकारणात शक्तीप्रदर्शन केलं आहे
डच वेले
हिंदुत्ववादी राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांनी भारतातील गुजरात राज्याची निवडणूक एकहाती जिंकली आहे. आणि त्यांच्या या विजयाने त्यांनी राष्ट्रीय राजकारणाची पायरी चढले आहेत. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करणं पार्टीला परवडण्यासारखं नाहीये.