नासाकडून तीन तबकड्यांचे (यूूएफओ) फूटेज अपलोड

पृथ्वीच्या वातावरणातून सहज अवकाशात प्रवेश करणाऱ्या तीन यूएफओंचे रहस्यमय व्हिडिओ फूटेज नासाने यू-ट्यूबवर अपलोड केले आहे. अवघ्या चार मिनिटांच्या हा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. यूट्यूबवर जवळपास नऊ लाख ७६ हजार जणांनी  हा व्हिडिओ पाहिला आहे. 

Updated: Jun 30, 2015, 04:19 PM IST
नासाकडून तीन तबकड्यांचे (यूूएफओ) फूटेज अपलोड title=

 वॉशिंग्टन : पृथ्वीच्या वातावरणातून सहज अवकाशात प्रवेश करणाऱ्या तीन यूएफओंचे रहस्यमय व्हिडिओ फूटेज नासाने यू-ट्यूबवर अपलोड केले आहे. अवघ्या चार मिनिटांच्या हा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. यूट्यूबवर जवळपास नऊ लाख ७६ हजार जणांनी  हा व्हिडिओ पाहिला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामधून हा व्हिडिओ शूट झाला आहे. नासाच्या अर्थ व्ह्युईंग लाईव्ह फीडने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे.  www.wnd.com ने दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये तीन यूएफओ दिसतात, जे पृथ्वीच्या वातावरणातून सहज अवकाशात निघून जातात.
 
जेव्हा हे तीन यूएफओ पृथ्वीच्या बाहेर निघून जातात, तेव्हा नासा हा व्हिडिओ थांबविला आहे. त्यानंतर एक संदेश येऊन पुन्हा त्या यूएफओंवर झूम केले आणि ते दाखविण्यात आले आहे... 

पाहा हा चार मिनिटांचा जबरदस्त व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.