'न्यूयॉर्क पोस्ट'ने ट्रम्प यांच्या पत्नीचा 'नग्न फोटो' छापला

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचा नग्न फोटो 'न्यूयॉर्क पोस्ट'ने छापला आहे. मात्र फोटोमुळे डोनाल्ड  अडचणीत आले असल्याचं म्हटलं जात आहे. 

Updated: Aug 1, 2016, 03:09 PM IST
'न्यूयॉर्क पोस्ट'ने ट्रम्प यांच्या पत्नीचा 'नग्न फोटो' छापला title=

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचा नग्न फोटो 'न्यूयॉर्क पोस्ट'ने छापला आहे. मात्र फोटोमुळे डोनाल्ड  अडचणीत आले असल्याचं म्हटलं जात आहे. 

डोनाल्ड यांची पत्नी मेलानिया या १९९० मध्ये  मॉडेलिंग क्षेत्रात होत्या. त्याकाळात त्यांनी केलेल्या फोटोशूटमधील एक फोटो 'न्यूयॉर्क पोस्ट'ने प्रसिद्ध केला आहे.

अमेरिकेच्या संभाव्य फर्स्ट लेडी

मेलानिया ट्रम्प यांचा फोटो 'न्यूयॉर्क पोस्ट'ने छापला आहे.  या फोटोमध्ये मेलानिया ट्रम्प यांनी केवळ हाय हिल्स घातली आहे.  अमेरिकेच्या संभाव्य फर्स्ट लेडीला तुम्ही असे कधीच पाहिले नसेल, असे या फोटोवर म्हणण्यात आले आहे. 

फ्रेंच मासिकासाठी फोटोशूट

 फ्रेंच छायाचित्रकार अल दे बासेव्हिले यांनी हा फोटो काढलेला आहे, त्याचे अधिकार न्यूयॉर्क पोस्टकडे आहेत. एका फ्रेंच मासिकासाठी १९९५ मध्ये हे फोटोशूट करण्यात आलं होतं, त्यातील हा एक दुर्मिळ फोटो आहे आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला नाही. 

मेलानिया २५ वर्षांच्या होत्या

पॅरिस आणि इटलीमध्ये मॉडेलिंग क्षेत्रात काम केल्यानंतर काही वर्षांपूर्वीच त्या अमेरिकेत परतल्या आहेत.हे फोटोशूट करण्यात आले त्यावेळी मेलानिया २५ वर्षांच्या होत्या. 

युरोपमध्ये असे फोटो अगदी सामान्य

मेलानिया ही त्याकाळातील एक यशस्वी मॉडेल होती आणि तिने विविध मासिकांसाठी त्यांच्या कव्हरपेजसाठी अनेक फोटोशूट केले आहेत. मी मेलानियाला ओळखण्याआधी तिने केलेल्या फोटोशूटमधील हा फोटो आहे. यूरोपमध्ये अशा प्रकारचे फोटो हे अत्यंत सामान्य असून, फॅशन म्हणूनच त्याच्याकडे बघितले जाते, असं या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्ट दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

फोटो काढताना अडचण जाणवली नाही

मेलानिया या खूप छान आहेत. त्यांनी फोटोशूटवेळी मला खूप सहकार्य केले होते. अशा पद्धतीने फोटो काढताना त्यांना कसलीही अडचण जाणवली नव्हती,  असं फ्रेंच फोटोग्राफर अल दे बासेव्हिले यांनी म्हटले आहे.