'महिलांसोबत काम केलं तर प्रेमात पडतातं, चूक दाखवली तर रडू लागतात'

एका नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचे विचार ऐकले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसोबत काम केलं तर पुरुष त्यांच्या प्रेमात पडतात, असं धक्कादायक वक्तव्य टिम हंट या वैज्ञानिकानं केलंय. 

Updated: Jun 11, 2015, 05:09 PM IST
'महिलांसोबत काम केलं तर प्रेमात पडतातं, चूक दाखवली तर रडू लागतात' title=

मॉस्को : एका नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचे विचार ऐकले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसोबत काम केलं तर पुरुष त्यांच्या प्रेमात पडतात, असं धक्कादायक वक्तव्य टिम हंट या वैज्ञानिकानं केलंय. 

हंट यांच्या म्हणण्यानुसार, महिला आणि पुरुष वैज्ञानिकांसाठी वेगवेगळी लॅब असावी... महिलांसोबत काम पुरुष सहकाऱ्यांचं ध्यान भंग होतं... आणि लोक प्रेमात पडतात...

इतक्यावरच हे महाशय थांबले नाहीत... जेव्हा कधी सहकारी महिलांवर कोणत्याही गोष्टीवरून टीका होते... तेव्हा त्या स्वत:चा बचाव करण्यासाठी अश्रुंचा आसरा घेतात, असंही हंट म्हणतायत. 

एका कार्यक्रमात बोलताना हंट यांनी मुलींसोबत आपल्या मुख्य तीन समस्या असल्याचं म्हटलंय. पहिली म्हणजे, मी त्यांच्या प्रेमात पडू लागतो, दुसरी म्हणजे त्यांही माझ्या प्रेमात पडू लागतात आणि तिसरी म्हणजे जेव्हा कधी त्यांना त्यांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या रडून आरडा ओरडा करतात. 

७२ वर्षीय हंट यांना २००१ साली सायकॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये नोबेल पुरस्कार मिळालाय. टिम यांचं हे वक्तव्य थोड्याच वेळात सोशल वेबसाईटवर वायरल झालंय. यावर महिलांनी चांगल्याच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर टीम यांनी लागलीच आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.