मुलांना रागवाल तर जेलमध्ये जाल...

सात वर्षीय मुलाला रागावल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या दांपत्याला सुमारे दीड वर्षांचा कारावास होण्याची शक्‍यता आहे.

Updated: Dec 1, 2012, 10:14 PM IST

www.24taas.com, नॉर्वे
सात वर्षीय मुलाला रागावल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या दांपत्याला सुमारे दीड वर्षांचा कारावास होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या भारतीय दांपत्याला सर्वतोपरी मदत करण्याचा आदेश परराष्ट्र मंत्रालयाने नॉर्वेतील भारतीय दूतावासाला दिला आहे.
भारतीय वंशाचे सॉफ्टवेअर अभियंते चंद्रशेखर वल्लभनेणी मूळचे आंध्र प्रदेशचे असून कामानिमित्त ओस्लो येथे राहतात. पत्नी अनुपमा यांच्यासह त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्या मुलाने शिक्षकाला पालकांनी रागावल्याचे सांगितल्यावर संबंधित प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर शिक्षकाने याची तक्रार स्थानिक प्रशासनाला दिली होती. प्रशासनाने मुलाला सुमारे महिनाभर बालगृहात ठेवले होते.
वारंवार मुलाला वाईट वागणूक दिल्यामुळे चंद्रशेखर यांना 18 महिने तर अनुपमा यांना 15 महिन्यांची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली आहे. या प्रकरणी 3 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. नॉर्वेच्या भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी या दांपत्याची भेट घेतली.