मुस्लीम देशात दुर्गा मातेच्या मंदिरात सतत पेटत राहते ज्योत

पाकिस्तानात नेहमी हिंदू आणि त्यांच्या मदिरांवर जरी अत्याचार होतं राहिले आहेत तरी देखील अजरबैजानमध्ये ९५ टक्के मुस्लीम लोकं असतांना देखील तेथील एका दुर्गा मातेच्या मंदिरात २४ तास ज्योत पेटत राहते. येथे भाविकांनी खूप जास्त गर्दी होत नसली तर येथील ज्योत अनेक वर्षांपासून पेटत आहे.

Updated: Oct 6, 2016, 09:03 AM IST
मुस्लीम देशात दुर्गा मातेच्या मंदिरात सतत पेटत राहते ज्योत title=

नवी दिल्ली : पाकिस्तानात नेहमी हिंदू आणि त्यांच्या मदिरांवर जरी अत्याचार होतं राहिले आहेत तरी देखील अजरबैजानमध्ये ९५ टक्के मुस्लीम लोकं असतांना देखील तेथील एका दुर्गा मातेच्या मंदिरात २४ तास ज्योत पेटत राहते. येथे भाविकांनी खूप जास्त गर्दी होत नसली तर येथील ज्योत अनेक वर्षांपासून पेटत आहे.

टेंपल ऑफ फायर
हे मंदिर टेंपल ऑफ फायरच्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. येथे अनेक वर्षांपासून ही ज्योत पेटत असल्याने त्याचं नावं टेंपल ऑफ फायर असं ठेवण्यात आलं आहे. हिंदू धर्मात अग्नीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे येथे सतत पेटत असलेल्या या ज्योतला देवीचं रुप मानलं जातं. येथे एक प्राचीन त्रिशूळ देखील आहे. मंदिराच्या भींतीवर गुरुमुखीचे लेख पाहायला मिळतात. मंदिरात प्राचीन वास्तुकला पाहायला मिळतात.

कोणी बनवलं हे मंदिर
असं म्हटलं जातं की आधी भारतीय व्यापारी या रस्त्याने जात होते. त्यामुळे याच लोकांनी हे मंदिर बनवलं होतं. इतिहासकारांच्या मते बुद्धदेव नावाच्या व्यक्तीने हे मंदिर बनवलं आहे. जे हरियाणाचे राहणारे होते.