www.24taas.com, लंडन
सौदी अरेबिया एक अशा शहर घडवणार आहे, जिथे असतील फक्त महिला... आणि याच शहरात शरिया कायद्यात राहूनच महिलांना आपलं करिअर घडवण्याची संधी इथं दिली जाणार आहे.
सौदी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, ‘सौदी औद्योगिक संपती प्राधिकरणा’ला जगाला अनुसरुण फक्त महिलाचं एक शहर बनवण्याचे आदेश दिले गेलेत. या कामाला पुढच्या वर्षी सुरुवात होणार आहे. या नव्या शहरात इस्लामी कायद्यांच्या बंधनात राहूनही महिलांना काम करण्याची संधी बहाल केली जाणार आहे.
तसं पाहता, सौदी अरेबियात शरिया कायद्यानुसार महिलांना काम करण्यास बंदी नाही, पण आकड्यांनुसार सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची संख्या फक्त १५ टक्के असल्याचं आढळून आलंय. या योजनेमुळे देशात झपाट्यानं प्रगती होऊ शकते आणि या प्रगतीत महिलांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असं मानलं जातंय. देशातील अनेक भागांत फक्त महिलांसाठीही काही उद्योग प्रस्थापित करण्याच्या योजनांवर काम सुरू आहे.