ओरलँडो : अमेरिकेच्या ओरलँडो येथे झालेल्या गोळीबारात ५० जण ठार झाले तर ५०हून अधिक जण जखमी झालेत.
या हल्ल्यादरम्यान एका मुलाने आईला मदतीसाठी पाठवलेले मेसेज सध्या व्हायरल होतायत. गोळीबारादरम्यान घडलेला सर्व वृतांत तो आईला मेसेज करुन सांगत होता तसेच पोलिसांनाही फोन करण्यास सांगत होता.
मिना जस्टिस या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मी क्लबजवळ होते. यावेळी क्लबमध्ये असलेल्या माझ्या ३० वर्षीय मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलाने क्लबमध्ये गोळीबार झाल्याचे तसेच पोलिसांना माहिती देण्यास सांगितले होते.
मिनाने पुढे सांगितले, गोळीबार झाला तेव्हा माझा मुलगा इतरांसोबत बाथरुममध्ये लपण्यासाठी गेला होता. ते लोक येतातय. ते इथेच आहेत. मी मरणार आहे, असा त्याचा शेवटचा संदेश होता.